वार्ताहर/ केळघर
पुनवडी ( ता. जावली ) येथील कोरोना बाधितांची साखळी काही तुटेना . त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे . तर काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून येथील एकूण बाधितांची संख्या 91 वर पोहचली आहे . तर दोघांचा बळी गेला आहे . आज जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . अनिरुद आठल्ये , तहसिलदार शरद पाटील ,सहाय्यक पोलीस निरिक्षक निळकंठ राठोड यांनी भेट देऊन साखळी तोडण्याविषयी सूचना केल्या .
पुनवडी येथील कोरोना बाधितांची .वाढती संख्या पाहता . आज वरील अधिकायानी भेट दिली . यावेळी तेजस्वी सातपुते यानी ही साखळी खंडीत करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना केल्या . यावेळी डॉ .आठल्ये यांनीही आरोग्य विभाग करत असलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतला .
तालुक्यातील पुनवडी येथील काल रात्रीच्या अहवालात आणखी 16 रुग्णांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला . तर त्यांच्या संपर्कात आलेल्या 82 जणांचे स्वाब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ . साधना कंवारे यांनी दिली .पुनवडी येथील कोरोना बाधितांचा आकडा 91 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत पुनवडी गावातील 379 जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत .
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. पुनवडीच्या साखळीने धास्ती वाढत आहे. त्याच बरोबर अनेक गावांत नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. प्रवाशां बरोबरच आता सहवासित कोरोना बाधितांची दररोज भर पडत आहे. ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून दक्षता घ्यावी . असे आवाहन तहसिलदार शरद पाटील यांनी केले आहे .
जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते , केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ . साधना कंवारे , आरोग्य सहाय्यक सतीश मेढेकर , विशाल रेळेकर , आरोग्य सेवक मोहन शिंदे , अरविंद सोमवंशी , आरोग्य सेविका अस्मा शेख यांच्यासह आरोग्य विभाग संयुक्तपणे विविध उपाययोजना करत दररोज घरोघरी फिरून माहिती घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी परिश्रम घेत आहेत . तर आ . शिवेंन्द्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. सदस्या सौ . अर्चना रांजणे , समाजसेवक ज्ञानदेव रांजणे यांनी गावात जीवनावश्यक वरतूचे वाटप करत . संपूर्ण गावात जंतू नाशक फवारणी करण्यात आली .