गेमिंग उद्योगाला चालना मिळण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने सॅन फ्रांसिस्को येथील मोबाईल गेमिंग कंपनी क्रिकीमध्ये गुंतवणूक केली आहे. रिलायन्स जिओने मात्र किती रुपयांची गुंतवणूक केली आहे, यासंदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र क्रिकीमध्ये आतापर्यंत एकूण 22 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.
भारतामध्ये क्रिकीने रिलायन्स जिओच्या मदतीने ऑगमेंटेड रियलिटीवर आधारीत ‘यात्रा’ नावाने एक मोबाईल गेम लाँच केला आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना या नवीन गेमला 3 डी सोबत खेळण्याची सुविधा उपलब्ध होणार असून सदरचा गेम गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस स्टोअरवर मोफत डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. देशातील गेमिंग उद्योग वर्ष 2021 पर्यंत जवळपास 100 अब्ज रुपयांच्या घरात पोहचला आहे. वर्ष 2022 पर्यंत हा आकडा 143 अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल. राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.