बेळगाव : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची सोमवारी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आर. व्यंगटेशकुमार यांची वर्णी लावण्यात आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अधिकाऱयांना स्वतःच्या जिल्हय़ात काम करता येत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यात आली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळीही त्यांची तात्पुरती बदली झाली होती.