सातारा / प्रतिनिधी :
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 11 मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत 31.11 टक्के मतदान झाले असून, जावली मतदान केंद्रावर दोन गटात बाचाबाचीचा प्रकार वगळता शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यातील मतदान केंद्रावर झालेले मतदान पुढील प्रमाणे : सातारा केंद्रावर 416 पैकी 106 (25.48%) जणांनी मतदान केले, जावली मतदान केंद्रावर 69 मतदानापैकी 58 (84.06%) मतदान झाले. महाबळेश्वरमध्ये 48 मतदारांपैकी 7 (14.58%) जणांनी मतदान केले. कराडमध्ये 332 पैकी 123 (37.07%) जणांनी मतदान केले. पाटणमध्ये 203 पैकी 125 (61.58%) जणांनी, कोरेगावमध्ये 131 पैकी 45 (34.35%), खटावमध्ये 150 पैकी 33 (22.00%), माणमध्ये 119 पैकी 23 (19.33%) , खंडाळा येथे 88 पैकी 12 (13.64%), वाईमध्ये 132 पैकी 17 (12.88%) मतदान झाले. फलटणमध्ये 276 पैकी 54 (19.57%) मतदान झाले, असे एकूण 1964 पैकी 603 (31.11%) मतदान झाले.