सातारा / प्रतिनिधी :
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी जिल्ह्यातील 11 केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारी वाजेपर्यंत 68. 38 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, जावली मतदान केंद्रावर आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे आणि वसंत मानकुमरे आमनेसामने भिडले. यावेळी दोन गटात राडा झाला. तर खटाव सोसायटी मतदार संघाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी थेट कोठडीतून मतदान केंद्रावर दाखल होऊन मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील मतदान केंद्रावर झालेले मतदान पुढीलप्रमाणे : सातारा केंद्रावर 416 पैकी 263 (63.22%) जणांनी मतदान केले, जावली मतदान केंद्रावर 69 पैकी 66 (95.65%), महाबळेश्वरमध्ये 48 मतदारांपैकी 32 (66.67%) जणांनी मतदान केले. कराडमध्ये 332 पैकी 236 (71.08%), पाटणमध्ये 203 पैकी 182 (89.66%), कोरेगावमध्ये 131 पैकी 85 (64.89%) मतदान झाले. खटावमध्ये 150 पैकी 92 (61.33%) मतदान झाले. माणमध्ये 119 पैकी 56 (47.06%), खंडाळा येथे 88 पैकी 45 (51.14%) मतदान झाले. वाईमध्ये 132 पैकी 82 (62.12%) मतदान झाले. तर फलटणमध्ये 276 पैकी 204 (73.91%) मतदान झाले. असे एकूण 1964 पैकी 1343 (68.38%) मतदान झाले.