प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हर्णे बाजारपेठ येथील ६८ वर्षीय रुग्णाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या २६ वर पोहचली.
त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या २६ वर पोहचली. दरम्यान, सोमवार सायंकाळपासून जिल्ह्यातील 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये दापोलीतील तब्बल 16 जणांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 599 झाली आहे.