प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. मेढा-सातारा रस्त्यावर झालेल्या अपघातात खेड, ता. सातारा येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. तर काशीळ गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात काशीळ येथील युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
याबाबत रुग्णालय पोलीस चौकीतील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुशांत प्रकाश कांबळे, (वय 35, रा. खेड, ता. सातारा) हा दि. 20 रोजी चिंचणी, ता. सातारा गावच्या हद्दीत मेढा सातारा मार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. राजेंद्र वाघ यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.
दुसऱ्या एका घटनेत दि. 19 रोजी 2.15 वाजण्याच्या सुमारास काशीळ, ता. सातारा गावच्या हद्दीत महामार्गावर गौरव बाळासो लोहार, (वय 29, रा. काशीळ, ता. सातारा हा दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी तो झाला. त्याला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.