अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 18 डिसेंबर 2021, सकाळी 11.00
● बाधित वाढ स्थिर
● मृत्युदर नियंत्रणात
● पहिला व दुसरा डोस घेतलेले 35 लाख 11 हजार
● 2835 जणांचे स्वॅब तपासणी
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात बाधित वाढ स्थिर असून शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालात 23 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. दिवसभरात 2835 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले होते. जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस घेतलेल्याची संख्या 35 लाख 11 हजार 97 वर पोहचली आहे.
2835 जणांचे स्वॅब तपासणी
जिल्ह्यातील दररोज अडीच ते तीन हजार जणांचे अजून स्वॅब तपासणी केले जात आहेत. 11 तालुक्यात ज्यांना संशय वाटतो ते जाऊन स्वॅब तपासणी करतात. दररोज नव्याने आढळून येणारी बाधित वाढ स्थिर ठेवली आहे. सातारा तालुका कधी पुढे तर फलटण तालुका पुढे जातो. तरीही सर्वच तालुक्यातील बाधित वाढ रोखण्यात यश आले आहे.
पहिल्या डोसचे 92 टक्के लसीकरण
जिल्ह्यातील पहिल्या डोसचे 22 लाख 79 हजार 500 जणांचे उद्दिष्ट होते त्यापैकी 20 लाख 96 हजार 5 जणांनी लस घेतल्याने 92 टक्के लसीकरण झाले आहे. तर दुसऱ्या डोससाठी 14 लाख 15 हजार 92 जणांनी लस घेतल्याने 62 टक्के लसीकरण झाले आहे. पहिला व दुसरा डोस घेतलले 35 लाख 11 हजार 97 एवढे झाले आहेत.
शनिवारी
नमुने-2835
बाधित-23
शनिवारपर्यंत
नमुने-23,46,915
बाधित-2,52,223
मृत्यू-6,487
मुक्त-2,44,776