69 हजार जणांनी केली कोरोनावर मात : बुधवारी 254 जण पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या महिन्याच्या तुलनेत जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चालली आहे. बुधवारी 254 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर गेल्या 24 तासांत 895 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हय़ातील आतापर्यंतचा बाधितांचा आकडा पाऊण लाखाच्या घरात पोहोचला असून 69 हजार 360 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 73 हजार 941 वर पोहोचला आहे. सध्या 3 हजार 860 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 14 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 721 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणात घट दिसून येत आहे.
चिकोडी, बैलहोंगल तालुक्मयातील प्रत्येकी तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रायबाग व बेळगाव तालुक्मयातील प्रत्येकी दोन, हुक्केरी, गोकाक, अथणी, सौंदत्ती तालुक्मयातील प्रत्येकी एक जण अशा एकूण 14 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. मृतांत 8 महिलांचा समावेश आहे. बेळगाव, चिकोडी तालुक्मयात बाधितांचा व मृतांचा आकडा वाढता आहे.
आतापर्यंत 8 लाख 91 हजार 375 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 8 लाख 8 हजार 298 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एकूण बाधितांचा आकडा पाऊण लाखाच्या घरात पोहोचला आहे. अद्याप 4 लाख 942 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. रुग्णसंख्या घटत चालल्यामुळे इस्पितळांवरील ताणही कमी होत चालला आहे.
बुधवारी कंग्राळी बी. के., बाळेकुंद्री बी. के., कुदेमनी, चलवेनहट्टी, येळ्ळूर, के. के. कोप्प, कंग्राळी के. एच., कट्टणभावी, केदनूर, सुळगा, शिंदोळी, हनुमाननगर, पार्वतीनगर, अलारवाड, आनंदवाडी पी. के. क्वॉर्टर्स, भाग्यनगर, अशोकनगर, बिम्स क्वॉर्टर्स, वैभवनगर, टिळकवाडी, श्रीनगर, हुलबत्ते कॉलनी, कलखांब, सुभाषनगर, कुमारस्वामी लेआऊट, शहापूर, अनगोळ, गांधीनगर, ओमनगर-खासबाग, इंद्रप्रस्थनगर, शाहूनगर, शास्त्राrनगर, शिवाजीनगर, उज्ज्वलनगर, वडगाव, वीरभद्रनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
17 जणांवर एफआयआर
लॉकडाऊनचे नियम मोडून हॉटेल सुरू ठेवणाऱया होसूर-बसवाण गल्ली येथील हॉटेल मल्हारचे मालक श्रीधर पाटील यांच्यासह शहापूर पोलीस स्थानकात 17 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. विनामास्क फिरणाऱया 163 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 26 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.