वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेमधून प्रवास करताना देशातील विविध विभागांमध्ये लॉकडाऊन लागू केल्यामुळे किरकोळ विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमधील बंदीमुळे जूनमध्ये किरकोळ विक्री जून 2019 च्या तुलनेत 50 टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) दिली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा किरकोळ व्यवसायांवर दबाव निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमध्ये कालावधी निश्चित केल्याने आणि आठवडय़ातील शेवटचे दोन दिवस बंदची घोषणा केली होती. परंतु पुढे हा कालावधी वाढल्यामुळे किरकोळ विक्रीवर सर्वाधिक परिणाम दिसून आल्याचे आरएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी म्हटले आहे.
अन्य उत्पादनांचा समावेश
ब्यूटी, वेलनेस आणि पर्सनल केअर साहित्याची किरकोळ विक्री ही 57 टक्क्यांनी घसरली आहे. तसेच कापड विक्री 52 टक्क्यांनी, कंझ्युमर डय़ूरेबल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विक्रीत 46 टक्क्यांची घसरण राहिली आहे. यासह फुटवेअर विक्री 61 टक्क्यांनी प्रभावीत राहिल्याची माहिती आहे.
स्पोर्ट्स उत्पादनात सर्वाधिक घसरण
आरएआय यांच्या व्यावसायिक सर्वेनुसार स्पोर्ट्स उत्पादनांची विक्री सर्वाधिक 66 टक्क्यांनी कमी राहिल्याचे दिसून आले आहे. तसेच जून 2019 च्या आकडेवारीच्या तुलनेत खाण्यापिण्याच्या साहित्याची आणि किराणा विक्रीत 7 टक्क्यांची सर्वाधिक घसरण राहिली आहे.