वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान घेतली जाणार आहे. दिल्ली संघटनेच्या खजिनदारपदासाठी होणाऱया निवडणुकीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सी. के. खन्ना यांची पत्नी शशी आणि गौतम गंभीर यांचे काका पवन गुलाटी यांच्यात चुरस राहील. पण भारताचे माजी आणि दिवंगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे चिरंजीव रोहन जेटली यांची अध्यक्षपदासाठीची निवड बिनविरोध होण्याची शक्मयता आहे.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या चार संचालक पदासाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या शर्यतीत अशोक शर्मा, दिनेशकुमार शर्मा, हरिश सिंघला, हर्ष गुप्ता, कर्नेल सिंग, मनजीत सिंग, प्रदीपकुमार अरोरा, प्रदीप अगरवाल, सुधीरकुमार अगरवाल यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. संघटनेच्या अध्यक्षपदासाठी रोहन जेटली यांनी आपला उमेदवारी अर्ज 7 ऑक्टोबर रोजी दाखल केला आहे.