प्रतिनिधी / बेळगाव
प्राचार्य जे. बी. फडके यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता वरेरकर नाटय़ संघ येथील के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी, टिळकवाडी येथे किरण ठाकुर, अश्विनी बिडीकर आणि अनिल चौधरी यांच्या हस्ते झाले.
प्रथम किरण ठाकुर यांनी प्रदर्शनाच्या फलकाचे अनावरण केले. त्यानंतर दीपप्रज्वलन अश्विनी बिडीकर आणि अनिल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य ज्योतिराज फडके यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर अनिल चौधरी व अश्विनी बिडीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
किरण ठाकुर यांनी एखाद्या कलेचा ध्यास घेतल्यास त्यात तुम्हाला तशा प्रकारे काम करणाऱया व्यक्ती पुढे पुढे भेटत जातात. त्याबाबतीत वाचन करा, काम करा, संधी तुमच्यापर्यंत चालत येते, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी चित्ररसिक, चित्रकार विद्यार्थी, स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.