गंगटोक
ः सिक्कीममध्ये एक बस उलटल्याने झारखंडमधील 22 विद्यार्थी जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सिक्कीम सरकारला विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली आहे. झारखंडच्या रांची येथील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाचे विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते. परतीचा प्रवास करताना त्यांची बस उलटली होती. जखमी विद्यार्थ्यांना ताडोंग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सोरेन यांनी अधिकाऱयांना दिले आहेत. परंतु स्थानिक हवामान प्रतिकूल असल्याने एअरलिफ्ट करता आले नाही.