वृत्तसंस्था / कोलकाता
मेकपसंबंधीत उत्पादनांची आवड बाळगणाऱयांसाठी आता आणखी एका कंपनीच्या उत्पादनांचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. झारा ब्युटी कंपनी लवकरच भारतात प्रवेश करत आहे. ओठ, डोळे, नखे, चेहरा व इतर संबंधीत सौंदर्य प्रसाधने झारा ब्युटी कंपनी उत्पादन करते.
लवकरच भारतात यांचे नवी दिल्लीत आपले स्वतःचे स्टोर सुरु होणार आहे. यासोबत कंपनी येत्या काळात इतर शहरातही आपले स्टोअर सुरु करण्याची योजना बनवत आहे. सध्याला खरेदीदारांना झाराची उत्पादने संकेतस्थळावरुन ऑनलाइन मागवता येतात, असेही कंपनीने म्हटले आहे. आपली सौंदर्य प्रसाधने ब्रिटीश मेकप आर्टिस्ट डायन केंडाल यांच्या कल्पकतेतून तयार करण्यात आल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले.