आईवडिलांच्या जन्मदिनीच मुलाचा जन्म
अमेरिकेत जन्मलेल्या मुलाच्या नावावर विक्रम
अलबामा येथील एका अमेरिकन जोडप्याने एका मुलीला जन्म दिला आहे. विशेष बाब म्हणजे या पती-पत्नीची जन्मतारीख एकच असून त्यांच्या मुलानेही याच तारखेला जन्म घेतला आहे. यावरुन अलबामा रुग्णालयाने एक छायाचित्र शेअर केले असून यात आईवडिलांनी एक कार्ड हातात धरल्याचे दिसून येते. हंट्सविले हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये कॅसिडी आणि डायलन स्कॉट यांनी 18 डिसेंबर रोजी स्वतःची मुलगी लेननचे स्वागत केले आहे. मुलीच्या पालकांचाही जन्मदिन 18 डिसेंबर रोजीच असतो.
कॅसिडी आणि डायलन स्कॉटचे हॉस्पिटलने अभिनंदन केले आहे. पहिल्या अपत्याला जन्म देणे कुठल्याही परिवारासाठी रोमांचक क्षणापेक्षा कमी नाही. परंतु या कुटुंबातील सर्व सदस्य रविवारच्या दिनी आणि त्याहून मोठी बाब म्हणजे 18 डिसेंबर या एकाच तारखेला जन्माला आले आहेत असे हॉस्पिटलने स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.
1,33,000 जन्मांमागे एकाच बाबतीत हे घडत असते, लेननचा जन्म झाला तेव्हा लोक रात्री 12.30 वाजता जल्लोष करत होते, या प्रेमळ कुटुंबाला जन्मदिनाच्या शुभेच्छा आम्ही सर्वांनी मिळून देऊया असे हॉस्पिटलने म्हटले आहे. या सोशल मीडिया पोस्टला हजारो लोकांनी लाइक केले असून 2 हजारांहून अधिक जणांनी शेअर केले आहे.