वृत्तसंस्था/ हरारे
लंकेविरूद्ध होणाऱया आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा करण्यात आली असून क्रेग इर्व्हिनकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. सदर मालिका विश्वकरंडक सुपर लीग स्पर्धा अंतर्गत राहील.
गेल्या सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वेने आपली शेवटची 3 सामन्यांची वनडे मालिका आयर्लंडविरूद्ध खेळली होती. मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान झिम्बाब्वेचा संघ आयर्लंड आणि स्कॉटलंडच्या दौऱयावर गेला होता आणि या दौऱयात इर्व्हिनकडे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. लंकेविरूद्ध आगामी वनडे मालिकेसाठी सलामीचा फलंदाज कैतानो आणि यष्टीरक्षक मॅदन्दे यांचा पहिल्यादाच झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. 16 जानेवारीपासून या मालिकेला प्रारंभ होणार असून दुसरा सामना 18 तर तिसरा सामना 21 जानेवारीला खेळविण्यात येणार आहे.