डिजिटल प्लॅटफॉर्म मजबूतीचा टाटाचा प्रयत्नः लाँचिंग पुन्हा एकदा लांबणीवर
वृत्तसंस्था/ मुंबई
टाटाचे डिजिटल सुपरऍपचे सादरीकरण पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. कारण कंपनी, बिगबास्केटसोबत अधिग्रहणाचा व्यवहार झाल्यानंतर भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. टाटाचे सुपरऍप हे मार्च 2021 पर्यंत सादर करण्यात येणार होते. बिगबास्केटचा व्यवहारासोबत टाटा समूहाची ऑनलाईन कझ्युमर स्पेसमध्ये प्रवेश करण्याचा मुख्य मानस आहे.
साधारणपणे टाटा समूह आपल्या विविध कझ्युमर व्यवसायाला एकत्रित आणणार असून यामध्ये एक ओम्नीचॅनेल डिजिटल प्लॅटफॉर्मसादर करण्याच्या तयारीत आहे. सुपरऍप हे प्रामुख्याने विविध उत्पादने व सेवा यांना एकाच छताखाली आणण्याचे संकेत आहेत. याच दिशेने कंपनीचे काम सुरु आहे. टाटा समूह ओम्नीचॅनेल डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुपरऍप सादर करणार असल्याचे ऑगस्ट 2020 मध्ये टाटासन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटले होते.
2020 मध्ये सादरीकरण?
टाटाचे सुपरऍप 2020 च्या अखेरीस सादर होणार होते, त्यानंतर म्हणजे मार्च 2021 मध्ये प्रारंभी हे सादरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यांच्याशी संबंधीत असणाऱया अधिकाऱयांच्या मतानुसार टाटा समूहाची अपूर्ण राहिलेले प्रयत्न पूर्ण करण्यासाठीची तयारी वेगोन सुरु आहे.
फेबुवारीत व्यवहार
टाटा समूह आणि बिग बास्केटने फेब्रुवारी 2021 मध्ये 1.2 अब्ज डॉलरमध्ये व्यवहार निश्चित झाला होता. त्यानंतर बिगबास्केटमध्ये टाटा समूहाची हिस्सेदारी 60 ते 63 टक्क्यांवर आली आहे. या व्यवहारानंतर टाटा समूहाने राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्यूनल आणि अन्य अथॉरिटीज वैधानिक आणि नियामकीय मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला होता.