बेंगळूर
इलेक्ट्रिक वाहनांकरीता आवश्यक असणाऱया चार्जिंगच्या सुविधेकरीता टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क टाटा पॉवरशी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. देशामध्ये टाटा पॉवर चार्जिंग संबंधित पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते. या संदर्भात टेस्ला कंपनीने टाटांशी संपर्क साधला असल्याचे समजून आले आहे. टेस्ला इलेक्ट्रिक कार निर्मितीचा कारखाना कर्नाटकात स्थापन करणार आहे. येथे इलेक्ट्रिक गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाणार आहे. चार्जिंगसाठी आवश्यक सुविधेसाठी टेस्ला आणि टाटा यांच्या प्राथमिक स्वरुपाची चर्चा सुरु आहे.