नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स आपल्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगासाठी काही व्यावसायिकांबरोबर गुंतवणूकीसाठी बोलणी करत असल्याचे सांगितले जात आहे.
टाटा मोटर्सला इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये लक्ष घालायचे असून त्याकरीता गुंतवणुकीची गरज मोठय़ा प्रमाणावर लागणार आहे. त्यासाठीच कंपनीने खासगी गुंतवणूकदारांशी व व्यावसायिकांशी बोलणी सुरू केली असल्याचे समजते. टाटा ग्रुप परवडणाऱया किंमतीची इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा विचार करते आहे. यावर्षी मार्चमध्ये समभागधारकांनी कंपनीच्या सदरच्या योजनेला मंजुरी दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा विचारही टाटा ग्रुपकडून केला जात आहे.