नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सला चालू आर्थिक वर्षात डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत 1 हजार 451 कोटी रुपयांचा एकत्रित तोटा झाला आहे. टाटा मोटर्सने यासंबंधीची माहिती शेअर बाजाराला दिली आहे.
मागच्या आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर कालावधीत कंपनीने 2 हजार 941 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचे तिमाहीदरम्यानचे उत्पन्न 72 हजार 229 कोटी रुपये राहिले आहे. एक वर्षाआधी सदरच्या तिमाहीतले उत्पन्न हे 75 हजार 653 कोटी रुपये इतके राहिले होते.