टोप / वार्ताहर
टोप ता. हातकणंगले येथील दक्षिणवाडी आंब्याचा मळा येथील ११ एकरातील ऊस शॉर्टसर्किटने जळुन खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.
आंब्याचा मळा येथे चौगले भाऊकीचा मळा आहे. याठिकाणी १५ एकराचे क्षेत्र आहे. त्यातील ११ एकर क्षेत्र संपूर्ण आडसाली लावणीचे क्षेत्र होते. दुपारी अचानक शॉर्टसर्किटने उसाला आग लागल्याने तो जळून खाक झाला.त्या क्षेत्रातील उस तोडणीला आला होता. ऊस जळाल्याने कृष्णात चौगले, बाळासो चौगले, शंकर चौगले,भगवान चौगले, चंद्रकांत चौगले, वसंत चौगले, आकाराम चौगले, तुकाराम चौगले, विठ्ठल चौगले, नारायण चौगले, रोहित चौगले, भिमराव चौगले या शेतकर्यांचा ऊस जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
याठिकाणी जळालेल्या ऊस क्षेत्राची पाहणी टोपचे तलाठी जयसिंग चौगले, कोतवाल सचिन कांबळे,दत्ता पोवार यांनी पाहणी करून पंचनामा केला.यावेळी छत्रपती राजाराम साखर कारखाना बावड्याचे शेती आधिकारी बापुसाो आवटी यांनी ही पाहणी केली.व उळालेला ऊस तातडीने तोडण्या देण्यात येईल असे सांगितले.