महाभियोगात डेमॉक्रेटिक पक्षाचे आवाहन
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना निर्दोष सोडू नका, असे आवाहन डेमॉक्रेटिक पक्षाच्या सिनेट सदस्यांनी रिपाब्लिकन पक्षाच्या सिनेट सदस्यांना केले आहे. ट्रंप यांच्यावर सध्या महाभियोगाची कार्यवाही सुरू आहे. ट्रंप यांची सुटका केल्यास जानेवारीत कॅपिटॉल हिल येथे हिंसाचार झाला तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते, असेही आवाहन करण्यात आले.
ट्रंप यांना या महाभियोगात दोषी मानले गेल्यास त्यांना पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविता येणार नाही, असे तेथील अनेक कायदेतज्ञांचे मत आहे.
नियम कसा आहे
विद्यमान किंवा माजी अध्यक्षांवर सिनेटमध्ये महाभियोग चालविला जातो. सिनेटच्या सदस्यांची एकंदर संख्या 100 आहे. यापैकी 67 सदस्यांनी ट्रंप यांना दोषी ठरविल्यासच ते दोषी ठरतात. सध्या सिनेटमध्ये डेमॉपेटिक पक्षाचे 50 तर रिपब्लिकन पक्षाचे 50 सदस्य आहेत. त्यामुळे महाभियोग फसण्याची शक्यता आहे.