बेनकनहळ्ळीजवळ घडली घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेनकनहळ्ळीजवळ रविवारी ट्रक्टरची ट्रॉली उलटून गंभीर जखमी झालेल्या युवकाचा रात्री खासगी इस्पितळात मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
सोमलिंगाप्पा मुंदीनमनी (वय 37) रा. बेनकट्टी, ता. सौंदत्ती असे त्याचे नाव आहे. या अपघातात आणखी एकजण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
ट्रक्टरमधून प्लायवूड घेऊन सोमलिंगाप्पा आणि त्याचा सहकारी निघाले होते. बेनकनहळ्ळीजवळ चालकाने ट्रक्टरला करकचून ब्रेक लावल्याने ट्रॉली उलटली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता सोमलिंगाप्पाचा मृत्यू झाला.