प्रतिनिधी / बेळगाव
विजय कॉलेज ऑफ फाईन आर्टतर्फे ‘ट्वेल कलर’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महांतेशनगर येथील ग्लास हाऊस येथे आयोजित या प्रदर्शनाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. बारा विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर काढलेल्या चित्रांचा यामध्ये समावेश आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, नगरसेवक राजशेखर डोणी यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
21 मार्च पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनात पूनम बी, विवेक बी. एम., विरेशा व्ही. एम., रंगनाथन ए., इराण्णा एच., प्रतिक जी., सुरेश बी., प्रकाश के., हनुमंत आय., श्रीधर एम., कावेरी के., विद्या के. या बारा विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारीत चित्रे काढली आहेत. शनिवारी पहिल्याच दिवशी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी या चित्र प्रदर्शनाला हजेरी लावली. आमदार अनिल बेनके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत यापुढेही अशीच प्रदर्शने आयोजित करावी असे सांगितले.