प्रतिनिधी / सातारा
कोरोना काळात राज्यभर रक्ताचा तुटवडा होत असताना वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन परिवाराच्या टीमने प्रत्येक जिह्यात रक्तदान शिबिरं घेऊन जात धर्म न पाहता सर्वांना अडचणीच्या काळात रक्त उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेतला आहे.याच पार्श्वभूमीवर राजधानी सातारा येथे रविवार दि. 11 ऑक्टोबर, 2020 रोजी वर्ल्ड मराठा ऑर्गनाइजेशन, सातारा ग्रुपने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.कोरोना च्या संकटात सुद्धा लढवय्या सातारकरांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 337 लोकांनी रक्तदान करून अनेक गरजू लोकांचे जिव वाचवले. सातारा मधील अनुभवलेले हे सगळ्यात मोठे रक्तदान शिबीर होते. विशेष करून महिला रक्तदात्यानी खूप चांगला प्रतिसाद या शिबिरास दिला. तसेच रक्तदाते आणि शिबिराचे आयोजक सातारा डब्लूएमओ टीम ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारा च्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, डॉ. संजोग कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, नगरसेवक अविनाश कदम, सामाजिक कार्यकर्त्या सौ.रेणू येळगावकर, विवेक कदम, निवृत्ती पाटील, कराड मनसे शहराध्यक्ष दादा शिंघन यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि या सामाजिक कार्याचे कौतुक केले. डब्लूएमओ टीमचं उत्तम आयोजन आणि लोकांचा सकारात्मक सहभाग यातून पुढील सर्व रक्तदान शिबिरांना असाच प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. हे महारक्तदान शिबीर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रवीण पिसाळ, दत्ता जगदाळे, जितेंद्र पवार, महेश गव्हाणे,धनराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सातारा जिल्हा डब्लूएमओ टीम मधील विशाल जाधव, ओमकार देशमुख, दत्ता शिंदे, दीपक माने, करण चव्हाण, योगिता घाडगे, दीप्ती भोसले, कैलास बाकले, शुभम महामुलकर गणेश गायकवाड, सुर्यकांत मोहिते, बाबा जाधव, दीपक पवार, बालाजी पवार, विनोद साबळे, सूरज पवार, प्रसाद रैनाक यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कराड आणि फलटण डब्लूएमओ टीम ने सुद्धा विशेष उपस्थिति देऊन मोलाचे सहकार्य केले. तसेच वाई येथील डब्लूएमओ टीमचे दादासाहेब काळे व माणिक जगताप या दोघानी वाढदिवसा दिवशी रक्तदान केले . पुढेही असेच भव्य शिबिराचे रविवार दि. 18 ऑक्टोबर रोजी कराड व फलटण मधे आयोजन केले आहे तिथेही असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम संघटनेकडून राबवले जातील असे शिबीर अयोजकांकडुन सांगण्यात आले.