अखिल गोमंतकीय शिवप्रेमी राष्ट्राभिमानी व धर्माभिमानी हिंदूंतर्फे आयोजन.रायगडावरील 32 मण सुवर्णसिंहासन प्रतिष्ठापना विषयावर मार्गदर्शन
डिचोली/प्रतिनिधी
अखिल गोमंतकीय शिवप्रेमी राष्ट्राभिमानी व धर्माभिमानी हिंदूंतर्फे आयोजित गुरूवर्य पू. संभाजीराव भिडे गुरूजी यांची भव्य महासभा रवि. दि. 18 एप्रिल रोजगार संध्या. 6 वा. डिचोलीतील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या महासभेत भिडे गुरूजी “32 मण सुवर्ण सिंहासन प्रतिष्ठापना रायगड किल्ले” या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या सभेला राज्यभरातून मोठय़ा संख्येने शिवप्रेमींची उपस्थिती लाभणार आहे. कोरोना संबंधीच्या सर्व मार्गदर्शक तत्वा?चे पालन करून हि सभा होणार आहे, अशी माहिती डिचोली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला श्रीकृष्ण धोंड, नारायण बेतकीकर, शेखर नाईक, भोलानाथ गाड, सुबोध माने, संकल्प गाड, निखिल दिक्षित, मंदार गावडे आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्यात भिडे गुरूजींचे कार्य जोरदारपणे सुरू असून त्यांनी स्थापन केलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत ते गड किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा देत आहेत. हा शिवरायांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्यांनीही शिवभक्तीचा वारसा पुढे न्यावा. हा त्यामागचा हेतू आहे. डिचोलीत होणाऱया सभेत भिडे गुरूजी रायगड किल्ल्यावर प्रतिष्ठापना करण्यात येणाऱया 32 मण म्हणजेच 1280 किलो वजनाच्या सुवर्ण सिंहासनाविषयी माहिती विशद करणार आहेत. रायगड किल्ल्यावर प्रति÷ापीत करण्यात येणारे सिंहासन कोणत्याही सरकारी योजना अथवा राजकीय पक्षांच्या सहकार्याने होणार नसून शिवप्रेमींकडून येणाऱया आर्थिक सहकार्यातून होणार आहे. सदर सिंहासनाच्या सुरक्षिततेचीही संपूर्ण योजना भिडे गुरूजींनी तयार ठेवली आहे. असे यावेळी सुबोध माने यांनी सांगितले.
गोवा राज्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत असून अनेकदा गोवा राज्यात त्यांना राज्याबाहेरील राजा असे संबोधले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अशी टिप्पणी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे यावेळी सुबोध माने पुढे म्हणाले.
राज्यात भिडे गुरूजींची होणारी सभा हि ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरच आयोजित करण्यात आली असल्याने या सभेला मोठी स्फूर्ती मिळणार आहे. गोमंतकातील मोठय़ा संख्येने शिवप्रेमी हिंदू या सभेला जमणार असून या सभेत आज आपण हिंदू म्हणून कुठे आहोत आणि भविष्यात आम्हाला काय करायचे आहे. यावरही भिडे गुरूजींना मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात येणार आहे, असे श्रीकृष्ण हळदणकर यांनी सांगितले.
18 एप्रिल हा डिचोली आणि समस्त राज्यासाठी प्रेरक असा दिवस आहे. यापूर्वी या राज्यात आणि विशेषतः डिचोली महालात छत्रपती शिवाजी महाराज, नंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे चरण स्पर्श झाले. आणि आता या भुमीला संभाजीराव भिडे गुरूजी यांघे चरण स्पर्श होणार आहेत. भिडे गुरुजी हे एक उच्च शिक्षित व्यक्तीमत्व असूनही ते सध्या आपल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेतर्फे माणूस घडविण्याचे मौल्यवान कार्य करीत आहेत. त्यांच्या सभेला उपस्थित राहून त्यांचे विचार ऐकणे म्हणजे आमच्यासाठी सौभाग्याचेच आहे. यासाठीच या सभेला मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भोलानाथ गाड यांनी केले आहे.