वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्होडाफोन इंडिया फाउंडेशनकडून डिजिटल साक्षरता आणि आत्मनिर्भर होण्यासाठी एका पोर्टलची सुरुवात केली आहे. व्होडाफोन इंडिया फाउंडेशन दूरसंचार सेवा सादर करणारी कंपनी व्होडाफोन आयडियाची कॉर्पोरेट सामाजिक कार्य करणारी एक संस्था आहे. त्याच्या अंतर्गत ही योजना सुरु केली असल्याची माहिती दिली आहे.
कंपनीने एका ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल साक्षर डॉट ओरजी असे पोर्टल सुरु केले आहे. सदर पोर्टलमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि क्यावसायिक माहिती उपलब्ध होणार आहे. याची रचना ही प्रदाता सीजीआय तसेच नासकॉम फांउडेशन यांच्या मदतीने तयार करण्यात आली आहे.
वैयक्तिक शिक्षणास लाभ
व्होडाफोन इंडिया फाउंडेशनच्या माहितीनुसार सदरचे पोर्टल हे स्वयं शिक्षण घेण्यासाठी अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे. यामध्ये डिजिटल साक्षरतेची देवाण घेवाणीसोबत संबंधीताना रोजगारशील आणि उद्योगास सक्षम करण्याची योजना यातून प्राप्त होणार असल्याचे व्होडाफोन फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.
सर्व समूहांवर केंद्रीत पोर्टल
व्होडाफोनचे पोर्टल हे विनाशुल्क असून यामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेतील जवळपास 40 पेक्षा अधिक पाठय़पुस्तकांचा समावेश केला आहे. या अभ्यासक्रमात प्रामुख्याने सर्व वर्गातील समूहांना केंद्रीत करुनच याची रचना करण्यात आल्याचे म्हटले आहे.