प्रतिनिधी /बेळगाव :
निर्मिती समाजसेवा संस्था कुद्रेमनी व सावित्रीबाई फुले महिला मंडळ कुद्रेमनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. कोरोनाच्या संकटात कष्टकरी, कामकरी नागरिकांसाठी कार्यरत असणाऱया गावातील डॉ. विजय कट्टीमनी व डॉ. भाग्यश्री कट्टीमनी या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. कुद्रेमनी तसेच पाटणे फाटा व जंगम हट्टी या गावात आरोग्याच्या सुविधा देण्याचे कार्य कट्टीमनी डॉक्टरांनी केले आहे. तसेच डॉ. निवृत्ती व डॉ. वंदना गुरव यांनी देखील आरोग्याच्या सुविधा पुरविल्या आहेत. याची दखल घेत शाल श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोपटे व ग्रंथाची भेट देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशा पाटील यांनी केले. डॉक्टरांचा सत्कार कविता कडलगेकर, व निशा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा सुतार यांनी केले. आभार माया धामणेकर यांनी मानले. यावेळी संजना पाटील, सुनिल पन्हाळकर, संजना पेडणेकर, लक्ष्मी गुरव, रेश्मा सुतार तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.