प्रतिनिधी/ बेळगाव
डॉक्टर्स डेचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगावतर्फे केएलई इंटरनॅशनल मेडिकल प्रोग्राममध्ये कार्यरत असलेले डॉ. रामचंद्र रायचूर यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष श्रीधन मलीक यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. डॉ. रामचंद्र रायचूर यांचा माजी फेडरेशन अध्यक्ष राजू माळवदे व उपाध्यक्ष सचिन केळवेकर व विजय खोत यांनी शाल, भेटवस्तू, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
डॉ. रामचंद्र रायचूर यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करून डॉक्टर दिनाबद्दल माहिती दिली. माजी युनिट डायरेक्टर प्रविण त्रिवेदी यांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या.