रशियासाठी युक्रेनमधील डोनाबास संघर्ष सर्वात निर्णायक ठरणार आहे, असा दावा ब्रिटनच्या संरक्षण विभागाने केला आहे. डोनाबासच्या संघर्षात रशियाला माघार घ्यावी लागल्यास त्याचे नितीधैर्य खचणार असून त्याची पिछेहाट होऊ शकते, असे या विभागाचे मत आहे. मात्र, रशियाने येथे बाजी मारल्यास संपूर्ण युपेनवर विजय मिळविण्याच्या दिशेने त्याची पावले पडतील, अशी शक्यता आहे.
मागच्या महिन्यात रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हला वेढले होते. तथापि, तीव्र प्रतिकारामुळे रशियाची मोठी हानी झाली. परिणामी कीव्हच्या परिसरातून रशियाला सैन्य मागे घ्यावे लागले होते. त्यानंतर रशियाने युक्रेनच्या पूर्वभागात असणाऱया डोनाबासला लक्ष्य बनविले होते आणि तेथे जोरदार आक्रमण केले होते. मात्र, डोनाबास त्वरित आणि पूर्णपणे ताब्यात घेण्यास त्याला अपशय आले आहे. आजही तेथे तीव्र संघर्ष सुरु असून युक्रेनचे सैनिक टिकाव धरुन आहेत.