सातारा तालुका पोलीसांच्या डीबी पथकांची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
सैदापूर येथील आरोपी अर्जुन नागराज गोसावी याला सातारा जिह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही त्यांने आदेशाचा भंग करत सैदापूर येथील राहत्या घराच्या परिसरात मिळून आला. यामुळे सातारा तालुका पोलीसांच्या डीबी पथकाने त्याला ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती अशी की, गोसावी वस्तीतील आरोपी अर्जुन नागराज गोसावी याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तरीही हा सैदापुर वस्तीत फिरत आहे. अशी माहिती डीबी पथकाला मिळाली. डीबी पथकाने शुक्रवारी सैदापूर वस्तीत छापा टाकून अर्जुन गोसावी याला ताब्यात घेतले. आणि तडीपारीच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस हवालदार दादा परीहर, पोलीस कॉन्सटेबल नितीराज थोरात, सतिश पवार यांनी केली.