ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर काळजीवाहू सरकार स्थापन केले. मात्र, तालिबानच्या नव्या सरकारने आता शपथविधी समारोह न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तालिबानने अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याला 20 वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर 11 सप्टेंबर रोजी शपथविधी समारोह घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मित्रराष्ट्रांच्या दबावानंतर तालिबानने शपथविधी सोहळा पुढे ढकलला होता. आता तो रद्द करण्यात आल आहे.
दुसरीकडे अनेक दिवस प्रयत्न करूनही तालिबानला पंजशीर खोऱयावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. पंजशीर खोरे प्रतिकार दलाने ताब्यात घेतलेला अफगाणिस्तानातील एकमेव प्रांत आहे. या खोऱयात सुरू असलेल्या लढाईदरम्यानच तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या मोठय़ा भावाची निर्घृण हत्या केली आहे.