प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ यंदा रद्द करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाणाऱयांसाठी एसटीने मोठा दिलासा दिला आहे. सातारा आगारातून हंगामी दरवाढ 10 टक्के करण्यात येत होती. प्रवाशांची संख्या वाढेल तशी एसटीच्या फेऱयाही वाढवण्यात यायच्या अशी माहिती आगारा व्यवस्थापक (कनिष्ठ) रेश्मा गाडेकर यांनी दिली.
गाडेकर म्हणाल्या, सणासुदीचा काळ, सलग सुट्टया, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्राsत म्हणून 30 टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत चाकरमानी मोठया संख्येने गावाकडे येतात. यामध्ये मुंबई-पुणेहून येणाऱयाची संख्या जास्त असते. सातारा-स्वारगेट, सातारा-मुंबई, बोरोवली, ठाणे या मार्गावर जादा बसचे नियोजन करण्यात येते. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळली जाते.
यंदा मात्र कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तसेच काही खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱयांना वर्क फॉर्म होम काम करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे प्रवाशांची संख्या मंदावली आहे. प्रवाशांची संख्या कमी असल्याने काही फेऱया रद्द होत आहेत. यात दिवाळीच्या अनुशंगाने दरवाढ केली तर प्रवाशांना खिशावर पुन्हा भार पडेल म्हणून हंगामी दरवाढ रद्द करून परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना दिवाळीची भेट देण्यात आली आहे.