प्रतिनिधी/बेंगळूर
माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या आपल्या एका आक्षेपार्ह व्हिडिओसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, त्या व्हिडिओमध्ये मी नाही आणि हे माझ्या शत्रूंनी फक्त स्वार्थासाठी आणि माझी प्रतिमा खराब करण्यासाठी तयार केलं आहे”, असा दावा गौडा यांनी केला आहे. रविवारी (१९ सप्टेंबर) दिलेल्या स्पष्टीकरणात गौडा यांनी ही व्हिडिओ क्लिप ‘पूर्ण बनावट’ असल्याचा दावा केला. “माझा एक मॉर्फ्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माजी केंद्रीय मंत्री गौडा यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. “मी सायबर क्राईम पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. लवकरच गुन्हेगार पकडले जातील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे”, असं देखील गौडा यांनी पुढे म्हटलं. “शिवाय, कोर्टाच्या मनाई आदेशानुसार ही व्हिडीओ क्लिप कोणालाही पाठवणं किंवा अपलोड करणं हे कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या संबंधित कलमांनुसार दंडनीय असेल”, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.