प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या खजिन्यात खडखडाट असल्याने थकीत भाडे वसूल करण्याची मोहीम महापालिकेच्या महसूल विभागाने चालविली आहे. गोवावेस येथील मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील दोन गाळेधारकांकडे सहा लाखाची थकबाकी आहे. यामुळे दोन्ही गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली.
थकीत भाडे वसूल करण्यासाठी कडक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. यामुळे मटण मार्केट, महात्मा फुले भाजी मार्केट या पाठोपाठ आता शहापूर येथील व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडील थकीत भाडे वसूल करण्यासाठी मोर्चा वळविण्यात आला आहे. गोवावेस येथील व्यापारी संकुलातील दोन गाळेधारकांनी भाडे भरले नसल्याने सहा लाखाची थकबाकी होती. त्यामुळे भाडे भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. पण सोमवारपर्यंत भाडय़ाची रक्कम भरणा केली नसल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी दोन्ही गाळय़ांना टाळे ठोकले. यावेळी महापालिकेचे महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर आदींसह महसूल विभागाचे अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.
भाडे थकविणाऱया गाळेधारकांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मोहीम सुरूच राहणार असून लवकरच आणखी एका क्यापारी संकुलातील गाळय़ांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.