वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंग्लंड विरूद्ध चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेला षटकांची गती राखता आली नाही या कारणास्तव आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला सहा गुणांचा दंड करण्यात आला असून या संघाला मिळणाऱया मानधन रकमेतील 60 टक्के रक्कमही दंड म्हणून द्यावा लागणार आहे.
डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाला निर्धारित वेळेत तीन षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यांना या षटकांसाठी जादा वेळ द्यावा लागला या कारणास्तव दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपतर्फे सहा गुणांचा दंड करण्यात आला. तसेचा संघाला मानधनापैकी 60 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार असल्याची माहिती आयसीसीचे सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांनी दिली.