सामान्य सर्दी अन् कोविड-19 ची एकच चाचणी
हिवाळय़ात सामान्य सर्दीचे रुग्ण वाढणार आहेत, परंतु कोरोना महामारी सुरू असून त्याची लक्षणेही सामान्य सर्दीशी मिळतीजुळती आहेत. अशा स्थितीत दक्षिण कोरियात आरोग्य अधिकाऱयांनी नवी चाचणी पद्धत मंजूर केली आहे. यात एकाच नमुन्यात कोविड-19 आणि सामान्य सर्दीच्या संक्रमणाचा शोध लावता येणार आहे.
सर्दीचे रुग्ण वाढणार असल्याने या नव्या चाचणीमुळे रुग्णालयांवरील भार कमी होणार आहे. देशा संक्रमण फैलावण्यापासून रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. परंतु थंडीच्या काळात कोरोना विषाणू अधिक फैलावू शकतो असे जाणकारांचे मानणे आहे.
दक्षिण कोरियात दिवसभरात 118 नवे रुग्ण सापडले असून यातील बहुतांश जण सोलच्या घनदाट लोकसंख्येच्या क्षेत्रातील आहेत.
नव्या पद्धतीचे वैशिष्टय़
चाचणीच्या नव्या पद्धतीत कोविड-19 आणि सर्दी या दोन्हींमध्ये असलेल्या जीन्सवर लक्ष केंदीत करण्यात आले आहे. हे पीसीआर चाचणीचे विकसित स्वरुप असून यात नाक आणि गळय़ातून नमुना घेत कोविड-19 ची चाचणी केली जाते. सर्दी आणि कोविड-19 या दोन्ही संसर्गाचा 3-6 तासांमध्ये शोध लावण्यात आल्यास संबंधिताला सुविधा होईल आणि आरोग्य कर्मचाऱयांवरही अतिरिक्त भार पडणार नसल्याचे आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यून तैहो यांनी म्हटले आहे.