ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
दक्षिण गुजरातमध्ये सोमवारी सायंकाळी 5.19 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हा भूकंप अहमदाबादपासून 200 किलोमीटर दूर भरूच जिल्ह्यात झाला. गांधीनगर मधील भारतीय भूगर्भविज्ञान अनुसंधान संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टल स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्र भरूच शहरातील पूर्व दक्षिण पूर्वपासून सात किलोमीटर दूर होते. भूकंप झाल्याचे जाणवताच शहरातील लोक आपल्या घरातून बाहेर पडले.