प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील सर्व लोकांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा पुरविण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले. बेंगळुरातील मागडी रस्त्यावर कर्नाटक होमिओपॅथी मंडळाने बांधलेल्या होमिओ भवनाचे उद्घाटन करून ते बोलत होते.
येडियुराप्पा पुढे म्हणाले, सामान्य जनतेला परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टिने राज्य सरकारने अनेक योजना जारी केल्या आहेत. आज उद्घाटन केलेल्या होमिओ भवन सरकारसाठी लाभदायक ठरणार आहे. होमिओपॅथी औषध जगातील सर्वाधिक लोकप्रिय औषध बनत आहे. तीव्र आजारांवर सदर औषध प्रभावी आहे. होमिओपॅथी औषध ही एक लोकप्रिय औषध प्रणाली असून जी नैसर्गिकरित्या कार्यक्षमतेचा सिद्धांत वाढविण्यास प्रभावी आहे, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटक होमिओपॅथी मंडळात सुमारे 14,300 नोंदणीकृत डॉक्टर आहेत. या होमिओ भवनातील नवे संशोधन, प्रयोग नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यात मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, मंत्री. डॉ. के. सुधाकर, सुरेशकुमार आदी उपस्थित होते.