2020 या वर्षात दर मिनिटाला 1,19,000 सायबर हल्ल्यांचा शोध लागला आहे. या सायबर हल्ल्यांमुळे 62.6 अब्ज (6260 कोटी) धोक्यांचा सामना करावा लागला. यातील 91 टक्के धोके फिशिंग ईमेलच्या स्वरुपात दिसून आल्याची माहिती जपानच्या माहिती-तंत्रज्ञान विषयक सुरक्षा कंपनी ट्रेंड मायक्रोने दिली आहे. कंपनीने मागील वर्षी सुमारे 14 दशलक्ष (1.4 कोटी) फिशिंग युआरएलचा शोध लावला आहे. या फिशिंग युआरएलच्या मदतीने घरात काम करणाऱया लोकांना लक्ष्य केले जाणार होते.
ट्रेंड मायक्रो 2020 ऍन्युअल सायबरसिटी रिपोर्टला ‘अ कॉन्स्टेंट स्टेट ऑफ फ्लक्स’ असे शीर्षक देण्यात आले आहे. या अहवालानुसार वर्क फ्रॉम होम करणाऱया वापरकर्त्यांवर मागील वर्षी सायबर हल्ल्यांमध्ये 210 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा सुमारे 2.9 अब्जपर्यंत राहिला आहे. राउटर किंवा स्मार्ट उपकरणांना सायबर हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले असून यात लोकांना लॉगइन करण्यासाठी भाग पाडण्यात आले.
पेमेंटसाठी भाग पाडले
रॅन्समवेअरच्या मदतीने कुटुंबात 34 टक्क्यांनी सायबर हल्ले वाढली आहे. या प्रकरणांमध्ये हॅकर्स वापरकर्त्याचा विदा (डाटा) चोरून त्याला पेमेंट करण्यासाठी भाग पाडत होते. मागील वर्षी अशाप्रकारचे सायबर हल्ले अधिक दिसून आले आहेत. सरकार, बँकिंग, निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रालाही लक्ष्य करण्यात आले.