ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक देवेंद्र सिंह यांनी दहशतवाद्यांना चंदिगड आणि नंतर दिल्लीला सुरक्षित पोहोचवण्यासाठी लाखो रुपये घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
रविवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चेकिंग सुरू असताना हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्मयांसोबत देवेंदर सिंह आढळले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांच्या घरात छापे टाकून पोलिसांनी 5 ग्रेनेड आणि 3 एके 47 हस्तगत केल्या होत्या.
देविंदर सिंह असे या पोलीस अधिकाऱयाचे नाव असून, ते जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. अटक केल्यानंतर तपासादरम्यान, हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांशी देवेंद्र सिंह याचे संबंध असल्याचे उघड झाले. त्याने दहशतवाद्यांना चंदिगड आणि नंतर दिल्लीला सुरक्षित पोहोचवण्यासाठी लाखो रुपये घेतले होते. दरम्यान संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अफजल गुरुसोबतही देवेंद्र सिंह यांचे संबंध होते अशी माहिती समोर आली आहे.