प्रतिनिधी /बेंगळूर
यंदा दहावी परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना 19 आणि 22 जलै रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणारे हॉलतिकीट दाखविल्यानंतर परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आणि तेथून परत येण्यासाठी मोफत व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी मोफत बससेवेचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. परिवहन खाते दहावी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी परीक्षा कालावधीत मोफत बसप्रवासाची सोय करते. यंदा देखील 19 आणि 22 जुलै या दिवशी परीक्षा विद्यार्थ्यांना हॉलतिकीट दाखवून मोफत बसप्रवास करता येणार आहे.