ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 3098 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 2 लाख 76 हजार 046 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शुक्रवारी दिल्लीत 2860 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 03 हजार 693 वर पोहचली आहे. यामधील 21,955 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 35 लाख 24 हजार 930 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 11,651 आरटीपीसीआर टेस्ट आणि 37,484 रैपिड एंटिजेन टेस्ट शुक्रवारी करण्यात आल्या आहेत.