ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच, महाराष्ट्रातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात मागील 24 तासात 11 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 लाख 28 हजार 514 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 70.9 % आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 8493 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 04 हजार 358 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 55 हजार 268 रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात 228 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 20 हजार 265 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 3.35 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 32 लाख 06 हजार 248 नमुन्यांपैकी 6 लाख 04 हजार 358 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 53 हजार 659 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 556 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.