अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 30 जानेवारी 2022, सकाळी 11.00
● गेल्या चार दिवसांपासून नव्याने बाधित वाढ होतेय कमी
● कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढू लागली
● हॉस्पिटलाझेशन प्रमाण अल्प
● नव्याने बाधित 804 जण
● जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट होवू लागला कमी
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यातील आतापर्यंत 24 लाख 91 हजार 387 जणांचे स्वॅब तपासणी झाले आहेत. अद्यापही दररोज 3 हजार 964 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात येत आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बाधित वाढ सुरु होती. ती गेल्या चार दिवसांपासून कमी होवू लागली आहे. शनिवारी दिवसभरात 804 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. पॉझिटीव्हीटी रेट ही 20.28 वर आलेला आहे. एकूणच जिल्ह्यासाठी दिलासादायक असे वातावरण बनत आहे. कोरोना झालेले रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी आनंदाने घरी परतत आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून घराच्या घरी उपचार घेवून बरे होणाऱ्यांची संख्या चांगली आहे.
बाधित वाढ रोखण्यात येवू लागले यश
सातारा जिल्हा प्रशासनाने जे ब्रीद वाक्य तयार केले आहे. त्यानुसार साताऱ्याचा निर्धार कोरोना हद्दपार याप्रमाणे आरोग्य यंत्रणा काम करत आहे. कोरोना शुन्यावर आणण्यासाठी प्रशासन सुरुवातीपासून मेहनत घेत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा काम करत असून त्यामध्ये यश येवू लागले आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2022 च्या पहिल्या दिवसांपासून जी बाधित वाढ सुरु राहिली होती. ती आता गेल्या चार दिवसांपासून कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दि. 27 पासून बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोनामुक्तीचा वेग वाढला
जे कोरोना बाधित होत आहेत. ते लवकरात लवकर कसे बरे होतील यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून त्यामध्ये यश येत आहे. त्यामुळेच गेल्या दहा दिवसांपासून कोरोनामुक्तीचा वेग वाढलेला दिसून येत आहे. कोरोनामुक्ती होवून आपल्या कुटुंबात, आपल्या घरात परत ठणठणीत बरे होवून परतणारे हे नव्याने बाधित आढळून येणाऱ्या संख्येपेक्षा जास्त आहेत. ही दिलासादायक बाब आहे. कोरोनामुक्ती दररोज 1500 च्या आसपास असून कालपर्यंत2 लाख 59 हजार 6 जण कोरोनामुक्त झाल्याची आकडेवारी दिसत आहे.
हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण अत्यल्प
कोरोनाची गंभीर लक्षणे असलेले रुग्णच रुग्णालयात उपचार घेत आहेत. उरलेले सौम्य लक्षणे असलेले रुग्ण हे स्वतः डॉक्टरांच्या सल्ल्याने घरच्या घरच्या घरीच उपचार घेत असून त्यामुळे हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण अल्प आहे. सक्रीय रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल व बाधितांना चांगला उपचार कसा देता येईल याकरता आरोग्य यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे चारशे ते साडे चारशेच्या दरम्यान रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या आहे.
रविवारी
नमूने-3964
बाधित-804
रविवारपर्यंत
नमूने- 24,97,387
बाधित-2,75,486
मृत्यू-6,574
मुक्त-2,59,806