सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली सरकारला चपराक
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीमध्ये कोरोनाने मृत्यू झालेले आणि सध्या कोरोनाग्रस्त असलेल्या रूग्णांना जनावरांपेक्षाही वागणूक दिली जात असल्याची चपराक सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला लगावली आहे.
दिल्लीमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे शव कचरा कुंडीत आढळून आले होते. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना जनावरांपेक्षा भयानक वागणूक दिल्याचा आरोप केला जात आहे. यासंबंधीचा बातम्या टीव्हीवर प्रसारित झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेत न्यायालयाने दिल्ली सरकारला सुनावले आहे.
दिल्लीत रुग्णालयामध्ये खूपच गंभीर स्थिती आहे. एम एच ए च्या निर्देशानुसार काम केले जात नाही. मृतदेहांना नीट हाताळले जात नाही. माध्यमातील माहितीनुसार, दिल्लीतील सरकारी रुग्णालयात मृतदेह ठेवायला जागा नाही. रुग्णालयातील लॉबी, पॅसेजमध्ये मृतदेह ठेवले जात आहेत. रुग्णालयात खाटा उपलब्ध असूनही रुग्णांना पळवले जात आहे, अशी टीका न्यायालयाने केली आहे. यासंबंधी दिल्ली सरकार बरोबरच केंद्र सरकारलाही नोटीस बजावण्यात आली आहे.