ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रोज नवे नवे उच्चांक गाठत आहेत. परिस्थिती अधिक भयंकर होत चालली आहे. कोरोना रुग्णांनी 12.53 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातच मागील 24 तासात 20 हजार 190 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 311 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 12 लाख 53 हजार 902 वर पोहोचली आहे. तर संक्रमणाचा दर 26.37 % इतका झाला आहे.
त्यातच मागील 24 तासात 19, 209 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 11 लाख 43 हजार 980 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 18,063 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 91 हजार 859 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 75 लाख 18 हजार 752 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 62,767 आरटीपीसीआर टेस्ट आणि 16,726 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 47,704 झोन आणि 1022 कंट्रोल रूम आहे.