एमआयएमचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
एमआयएमचे प्रमुख खासदार ओवेसी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावर काही जणांनी हल्ला केला आहे. घराची मोडतोड केली आहे. अशाप्रकारे अनेकवेळा त्यांच्या घरावर हल्ले झाले आहेत. लोकशाहीमध्ये असे प्रकार घडत असून हा लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव येथील एमआयएम संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
राजधानीमध्ये हा प्रकार घडला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ओवेसी हे एक प्रमुख नेते आहेत. ते अनेक ठिकाणी दौरे करत असतात. मात्र अशाप्रकारे हल्ले होत राहिले तर त्यांच्या जीवालाही धोका आहे. दिल्ली येथील हल्ला प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एमआयएमचे राज्याचे जनरल सेपेटरी लतीफखान पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..