जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलेल्या पत्रकारावर म्हैसूर येथे हल्ला झाला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी उर्दू आणि हिंदी पत्रकारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
म्हैसूर येथे काही जणांनी पत्रकार सफदर कैसर यांच्यावर हल्ला केला आहे. अशाप्रकारे अनेक घटना देशामध्ये घडत आहेत. त्यामुळे पत्रकार भीतीच्या छायेखाली आहेत. पत्रकारांवर हल्ला होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून हल्ला करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. एस. एम. मोकाशी, बी. एम. सैयद, नबीउल्ला एम. बी. इम्रान एन., जकाती यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते..