मुंबई
पुढच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात भारतीय दुचाकींच्या निर्यातीत चांगली प्रगती होताना दिसणार आहे. इंडरे या रेटिंग एजन्सीने निर्यातीबाबतीत केलेल्या पाहणीनुसार निर्यात पुढच्या आर्थिक वर्षात सुधारणार आहे. कोरोनादरम्यान सार्वजनिक पायाभूत सुविधांचा अभाव व सार्वजनिक वाहतुकीच्या गैरसोयीमुळे निर्यातीत अडथळे जाणवले होते. पण आता परिस्थिती सुधारल्याने निर्यातीला गती येईल. दुचाकींची निर्यात आफ्रिका, आशियाई देश आणि लॅटीन अमेरिकेतील देशांना केली जाते.